एप्रोटीनिनचा उपचार होऊ शकणार वापर : संशोधकांचा दावा
कोरोना महामारीच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धात लसीपासून औषधांपर्यंत अनेक संशोधने केली जात आहेत. अशाच एका संशोधनानंतर संशोधकांनी एका औषधाची ओळख पटविली असून त्याच्यात कोरोनाबाधितांवर उपचार करण्याची क्षमता आहे. सेल या जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार एप्रोटीनिन नावाच्या औषधाने कोरोना संक्रमणाच्या विषाणूच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. रशियात इन्फ्लुएंजाच्या उपचारासाठी एप्रोटीनिन एरोसोलला मंजुरी देण्यात आली आहे. याचा वापर आता कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी चाचणीच्या स्वरुपात सहजपणे केला जाऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. इन्फ्लुएंजाच्या रुग्णांमध्ये एरोटिनिन एरोसोलला अत्यंत चांगल्याप्रकारे सहन करण्याची क्षमता दिसून आली आहे. याचमुळे गंभीर कोरोनाबाधितांच्या उपचारात हे औषध मदत करू शकते असे म्हणता येईल असे उद्गार या संशोधनाचे लेखक मार्टिन माइकलिस यांनी केले आहे. मार्टिन हे कँट विद्यापीठात संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
एप्रोटीनिनला टीएमपीआरएसएस2 जीनला रोखण्याच्या दृष्टीने ओळखण्यात आले होते. तसेच आता इन्फ्लुएंजा विषाणू आणि कोरोना विषाणूवरील उपचाराचा पर्याय म्हणून ते सुचविण्यात आले आहे.
एप्रोटीनिनने विविध सेल प्रकारांमध्ये (काको2, कालू-3 आणि प्राथमिक ब्रोन्कियल एपिथेलियल सेल एअर-लिक्विड इंटरफेस) मध्ये सार्स-कोव-2 हालचालींना प्रदर्शित केले आणि यादरम्यान 4 विषाणूंना वेगळे केले आहे. एप्रोटीनिन एरोसोल सार्स-कोव-2 प्रतिकृतीच्या प्रारंभिक स्थानिक नियंत्रण आणि गंभीर आजार कोविड-19 चा वाढता प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते असे संशोधनांच्या निष्कर्षांमध्ये नमूद आहे.
दीर्घकाळापर्यंत प्रभाव

सर्व बाधितांमध्ये एकसारखी लक्षणे दिसून येत असल्याचे कोरोना विषाणूप्रकरणी आतापर्यंत आढळले आहे. बाधितांची लक्षणेच त्यांच्या संक्रमणाचे गांभीर्य निश्चित करतात. काही लोकांमध्ये या संक्रमणाची तीव्र लक्षणे निर्माण होतात. विशेष प्रकारच्या लक्षणांमधून एक व्यक्ती कोरोनाला दीर्घकाळापर्यंत सामोरा जाणार की नाही हे समजते.









