घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझर सोबत, सायंकाळी सात नंतर शुकशुकाट
गेल्या सहा-सात महिन्यापासून सातारकर धास्तीच्या
प्रतिनिधी/सातारा
पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत गजबजलेला सातारा अशी शहराची ओळख होती. सततची वाहतूक कोंडी, खरेदी-विक्रीचे व्यवहार, पर्यटनस्थळी होणारी गर्दी असे जीवनचक्र सुरू होते. मात्र या जीवनचक्राला कोरोनाचे ग्रहण लागले आणि संपूर्ण जीवनचक्र बदलून गेले. कोरोना वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नियम, अटी लागू केले. या नियमांचे पालन करत गेल्या सहा-सात महिन्यापासून सातारकर धास्तीच्या छायेत आहेत.
मार्च महिन्यात जिह्यात कोरोनाने शिरकाव केला. पहिला बाधित सापडल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. तब्बल चार महिन्यानंतर लॉकडाऊनचे नियम टप्प्याटप्याने शिथील होत गेले. नियम शिथील झाले तरी सातारकरांच्या जीवनात चांगलाच बदल अनुभवयाला मिळत आहे.
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरणे बंधन कारक असून लहान मुले, जेष्ठ, महिला सर्वच यांचा वापर करू लागले. तसेच घरात असल्यावर वारंवार हात स्वच्छ धुणे, घराबाहेर पडल्यावर सॅनिटायझरचा वापर करणे, शासकीय-खाजगी कार्यालयात सोशल डिस्टन्सचा नियमांचे पालन करणे. सर्दी, खोकला, ताप येऊ नये म्हणून थंड पदार्थ खाणे टाळले जात आहे. शेजारी, नातेवाईक यांच्या घरी जाणे टाळणे.
घरात वाफारा घेणे, गरम गरम व पौष्टिक जेवणांचा आस्वाद घेण्यावर जास्तीत जास्त भर देणे. याकडे जास्त लक्ष केंद्रीत झाले. कोरोनाचा बाधितांचा आकडा 30 हजाराच्या घरात गेला असूनही प्रशासनाने अनलॉकची प्रक्रिया राबविली आहे. काही अटी लागू करत जनजीवन पुवर्वत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे बाजारपेठेवर विपरीत परिणाम झालेला आहे. रोजगार नसल्याने खरेदीला बेक्र लागला आहे. अवास्तव होणार खर्च टाळण्यात येत आहे. बाहेरील खाद्य पदार्थाकडे खवय्यांनी पाठ फिरवली आहे. यामुळे विक्रेते दुहेरी संकटात सापडले आहेत. नागरिक कामशिवाय घराबाहेर न पडता घरात राहत आहेत. 5 वाजल्यापासून बाजारपेठेतील दुकाने बंद होत आहेत. सायंकाळी 7 नंतर संपूर्ण सातारा शहरात शुकशुकाट पसरत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









