प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर या भागातील कोरोना व्हायरस या जागतिक संकटामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात शेतकरी आपल्या शेतीमध्ये अत्याधुनिक शेतीचा वापर करत आहे. तसेच विविध पिके व तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी बँक ,सोसायटी व वेळ पडली तर खासगी सावकारांच्या कडूनही उचल करून शेती कशी फायद्यात आणता येईल. यासाठी प्रयत्न करत असतो, पण कोरोनाव्हायरस या जागतिक संकटामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे.
ऊस ,झेंडू, निशिगंध, गुलाब, जरबेरा, बकुळा इत्यादी उत्पादनाची पिके व भाजीपाला करून शेतकरी आपले गुजरान करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अतिवृष्टी महापूर, व आता कोरोनाव्हायरस यामुळे शेतकरी अतिशय संकटात सापडला आहे. मागील वर्षी उसाचे पैसे साखर कारखान्याकडून मिळालेले नाहीत ,जे दिलेले आहेत ते खाते वरती आलेले नाहीत ,आलेले आहेत ते खात्यावरती वर्ग झालेले नाही अशा संकटांना सामना करत आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामध्ये आता कोरोनाव्हायरस यामुळे तर शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे.