प्रवासी नसल्याने कंपन्यांनी रद्द केल्या फेऱया, शुक्रवारी केवळ 3 उड्डाणे
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे नागरीक इतर शहरांचा प्रवास टाळत असल्याने त्याचा फटका विमानसेवला बसत आहे. प्रत्येक दिवसाला 1 हजार 500 पर्यंत प्रवास करणाऱया बेळगाव विमानतळावरून सध्या केवळ 300 च्या आसपास प्रवासी प्रवास करीत आहेत. या रोडावलेल्या विमान प्रवाशांच्या संख्येने कंपन्यांनीही अनेक फेऱया रद्द केल्या आहेत.
शुक्रवारी बेळगाव विमानतळावरून इंडिगोची हैद्राबाद व बेंगळूर तर स्टार एअरच्या अहमदाबाद फेरी व्यतिरीक्त इतर सर्व विमानफेऱया रद्द करण्यात आल्या. बुधवारी दिवसभरात केवळ 289 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने शुक्रवारी स्पाईसजेटने हैद्राबाद व मुंबई या फेऱया रद्द केल्या. तर अलायन्स एअरनेही पुण्याची फेरी यापूर्वीच रद्द केली आहे. ट्रुजेटने तिरूपती, हैद्राबाद व कडाप्पा या फेऱया रद्द केल्या. यामुळे दिवसभरात केवळ तीनच फेऱया होवू शकल्या.









