प्रतिनिधी/सांगली
कोरोना हा रोगच नाही, तो मानसिक आजार आहे. कोरोनामुळे जी माणस मरतात ती जगायच्या लायक नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे यांनी केले. तसेच टाळेबंदीचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्याना कवडीमोल अक्कल नसल्याची जोरदार टीकाही त्यांनी ठाकरे सरकारवर केली. व्यापारी काढलेल्या मोर्चा वेळी ते प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते.
समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे, मात्र शासन हे दुशासन होता कामा नये, निवळ मूर्खपणा सुरू आहे. शासनाचे घातकी निर्णय आहेत. संसार आणि व्यापारी माती मोल झाले. टाळेबंदी चा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्याना कवडीमोल अक्कल नसल्याची जोरदार टीकाही ठाकरे सरकारवर केली.
लॉकडाऊन मध्ये खासदार आमदार यांचे पगार सुरू आहेत, त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत ; सामान्य माणसे उपासमार सुरू आहे. लोकांनी बंड करून उठल पाहिजेल. सामान्य माणसांच्या विचार नसलेले राज्यकर्ते राज्या पासून सम्पूर्ण देशात आहेत. असलं सरकार फेकून दिल पाहिजेल. दारू दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्या पोलीस काठया मारतात. असेही ते म्हणाले.
Previous Articleपंजाब : मागील 24 तासात 2,997 नवे रुग्ण; 63 मृत्यू
Next Article सातारा नगरपालिकेची सभा तहकूब








