पणजी /
कोरोनामुळे राज्यात मृत्यूचे तांडव सुरूच असून गुरुवारी कोरोनामुळे 6 जणांना मृत्यू आला. तीन दिवसात कोरोनामुळे तब्बल 23 जणांना मृत्यू आला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता 171 एवढी झाली आहे. गुरुवारी 27 रोजी नवीन 456 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे सक्रीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3445 एवढी झाली आहे. गुरुवारी 356 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मडगाव सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मडगावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 496 झाला आहे. फेंडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 258 झाला आहे. वास्कोची रुग्णसंख्या 267 झाली आहे. म्हापसा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 163 तर पणजीची रुग्णसंख्या 168 झाली आहे.
मडगावनंतर सांखळीतही रग्णसंख्येत वाढ
आता सर्वच भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सांखळीची कोरोना रुग्णसंख्या 108 झाली आहे. पेडणेची रुग्णसंख्या 94 तर वाळपईची रुग्णसंख्या 86 एवढी झाली आहे. हळदोणा येथील रुग्णसंख्या 65 तर बेतकीची रुग्णसंख्या 71 झाली आहे. कांदोळीची रुग्णसंख्या 60 तर कासारवर्णेची रुग्णसंख्या 40 झाली आहे.
कोलवाळ येथील कोरोना रुग्णांची संख्या 98 झाली आहे. खोर्लीची रुग्णसंख्या 113 तर चिंबलची रुग्णसंख्या 117 झाली आहे. शिवोलीची 74 तर पर्वरीची 177 झाली आहे. मये 29, कुडचडे 105, काणकोण 62, बाळ्ळी 27, कासावली 118, चिंचिणी 31, कुठ्ठाळी 55, कुडतरी 83, लोटली 55, मडकई 46, केपे 94, सांगे 36, शिरोडा 56, धारबांदोडा 34 तर नावेलीची रुग्णसंख्या 117 झाली आहे.









