प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोना होणाऱया मृत्यूंची संख्या वाढत असल्याचे दिसत आह़े जिह्यामध्ये कोरोनाने आणखी 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये चिपळूण तालुक्यातील तिघांचा समावेश आह़े जिह्यात मृत्यूंची वाढती संख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. दरम्यान रविवारी 214 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़
मृतांमध्ये संगमेश्वरमधील 73 वर्षीय पुरूष व 66 वर्षीय महिला, चिपळूणमधील 64 वर्षीय, 55 व 45 पुरूष तर गुहागरमधील 55 वर्षीय महिला यांचा समावेश आह़े यामुळे एकूण कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 398 इतकी झाली आह़े तर जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये तब्बल 936 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 159 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 55 असे एकूण 214 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल़े यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 58, दापोली 9, खेड 25, गुहागर 17, चिपळूण 53, संगमेश्वर 30, मंडणगड 00, लांजा 11 व राजापूर 11 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 12 हजार 733 इतकी झाली आह़े तर 166 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या आता 11 हजार 50 पर्यंत पोहोचली आह़े बरे होण्याचे प्रमाण 86.78 इतके आह़े कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार, रत्नागिरी 100, खेड 60, गुहागर 14, दापोली 42, चिपळूण 96, संगमेश्वर 46, लांजा 14, राजापूर 21, मंडणगड 5 जणांचा मृत्यू झाला आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या 398 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 3.12 इतका आह़े
एकूण रूग्ण -12733
नवे रूग्ण -214
मृत्यू -07
एकूण मृत्यू 398









