प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोनाने आणखी 14 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े तर नव्याने 123 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ रूग्णसंख्येत घट होत असली तरी मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या आता 2 हजार 284 इतकी आह़े तर मृत्यूचे प्रमाण 3.03 टक्के नोंदवले आह़े दरम्यान गेल्या 3 दिवसात चिपळुणातील दुर्गवाडी गावांत 14 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात 4 पालकांसह 10 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जिल्हय़ात एकूण 3 हजार 659 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 2 हजार 116 चाचण्यांपैकी 59 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 1 हजार 543 पैकी 64 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यात मंडणगड-1, दापोली-9, खेड-12, गुहागर-14, चिपळूण-20, संगमेश्वर-21, रत्नागिरी-41, लांजा-2 तर राजापूर-3 असे तालुकानिहाय रूग्ण सापडले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 75 हजार 433 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 2.78 टक्के इतका आह़े
जिह्यात शुक्रवारी एकूण 14 मृत्यूची नोंद करण्यात आल़ी मृतात दापोली-3, गुहागर-1, चिपळूण-1, संगमेश्वर-2, रत्नागिरी-4, लांजा-3, अशी 14 मृत्यूंची नोंद करण्यात आली आह़े एकूण मृतांची संख्या 2 हजार 284 इतकी आह़े मृत्यूदर 3.03 इतका नोंदवण्यात आला आह़े तर बरे झालेल्या 91 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 72 हजार 76 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.55 इतके आह़े 991 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 297 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़
दुर्गवाडीतील प्रकाराने आरोग्य विभाग सतर्क
कोरोना महामारीत दुसरी लाट ओसरली असून रूग्णसंख्या कमी झालेली असतानाच गेल्या तीन दिवसांत चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी गावांत चौदा कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामध्ये चार पालकांसह दहा विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
सध्या दिवसाला सरासरी 20 ते 25च्या दरम्यान रूग्ण तालुक्यात आढळत आहेत. तालुक्यात तालुक्यात सध्या 174 बाधित रूग्ण उपचार घेत आहेत. रूग्णसंख्या कमी झालेली असतानाच दुर्गवाडी येथे 3 दिवसांत 14 रूग्ण आढळून आले आहेत. 25 ऑगस्ट रोजी फुरूस आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बाधित आल्यानंतर गावात तसेच आरोग्य केंद्रात करण्यात आलेल्या एकूण 204 अंटीजेन तपासणीत आतापर्यंत 15 वर्षांखालील 10 विद्यार्थ्यांसह 4 पालकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच 62जणांचे करण्यात आलेले आरटीपीसीआरचे अहवाल प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांना कोणतीही लक्षणे नसून त्यांना पेढांबे येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. फुरूस आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात रूग्ण सर्व्हेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 11 पैकी 8 वाडय़ांमध्ये तपासणीही पूर्ण झाली आहे.









