प्रतिनिधी/ सातारा
कोरोनात एसटी बस सेवा सुरू होऊनही प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. यामुळे फेऱया रद्द होवून परिवहन महामंडळाला नुकसान होत होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऐन दिवाळीत चाकरमानी परतु लागले आहेत. सातारच्या एसटी स्टॅण्ड वर पूर्वीप्रमाणे गर्दी होत आहे. अनलॉकची प्रक्रिया सूरू झाल्यानंतर जिल्हातर्गंत एसटीबस सेवा सुरू झाली होती. याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. यामुळे प्रवाशांच्यात धास्ती निर्माण झाली होती. एसटीबसमधून फक्त दहा ते बारा प्रवाशी प्रवास करत होते. तर काही फेऱया प्रवाश्याअभावी फिरत होत्या. ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त त्याच मार्गावर एसटीबस सुरू होत्या. फक्त सकाळी दोन संध्याकाळी दोन असे नियोजन करण्यात आले होते. प्रवाशांची संख्या पुन्हा वाढणार का अशी चर्चा सुरू होती.
तोच दिवाळीच्या औचित्याने चाकरमानी परतु लागले आहेत. पुणे-मुंबई येथील चाकरमानी सुट्टीसाठी गावाला येत असून सातारच्या एसटी स्टॅड वर गेल्या दोन तीन दिवसापासून प्रवासी संख्या वाढलेली आहे. स्वारगेट-सातारा, पुणे, मुंबई, बोरोवली या मार्गावर जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिह्यातील तालुक्यातही प्रवासी संख्या वाढल्याने फेऱया वाढवण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोनाची धास्ती कमी झालेली पहायला मिळत आहेत. यांचा फायदा परिवहन महामंडळाला झाला असून फेऱया रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.








