प्रतिनिधी / इस्लामपूर
कोरोनाचे संकट राजकारणाच्या पलिकडचे आहे. महाराष्ट्र हॉटस्पॉट बनत आहे.संक्रमण व मृत्यूदर वाढत आहे. अशा काळात सत्तारुढ पक्षांनी राजकारण न करता, एकमेकांना सोबत घेवून काम करण्याची गरज असून विरोधक म्हणून सुरुवाती पासूनच आमची सकारात्मक भूमिका आहे. सरकारने आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
येथील प्रकाश हॉस्पिटल हॉस्पिटलच्या कोविड सेंटरला फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. दरम्यान त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे व रुग्णांशी संवाद साधला. यावेळी माजी आ.शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, प्रकाश हॉस्पिटलचे संस्थापक व नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सी.बी.पाटील, सत्यजीत देशमुख, राहूल महाडीक यांच्यासह अन्य उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रासह याभागात कोरोना वेगाने वाढत आहे.
मात्र त्या वेगाने आरोग्य व्यवस्था वाढत नसल्याची खंत व्यक्त करुन फडणवीस म्हणाले, सांगलीचा मृत्यूदर वाढला आहे. कोरोनाच्या दृष्टीने एक महिना गंभीर राहणार आहे. संक्रमणाचा दर वाढला आहे. दररोज १४ ते १५ हजार रुग्ण आढळून येत आहेत.त्यासाठी सरकारने बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर वाढवण्यावर भर द्यावा. राज्यातील सर्व त्या आरोग्य सुविधांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करावा. दौऱ्यावरून गेल्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








