ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यात एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोना लवकरात लवकर रोकता यावे यासाठी वैद्यकीय शिक्षा अधिकारी अमित देशमुख यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे.
आता वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालयामध्ये कोरोना संबधित सर्व चाचण्या आणि उपचार निःशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत बोलताना अमित देशमुख म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड – 19 ला संसर्गजन्य घोषित करण्यात आले आहे. राज्यात या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही परिस्थिती लक्षात घेत या आजरा संबधित सर्व तपासण्या आणि उपचार निःशुल्क करण्यात आले आहेत.
तसेच रुग्णांना सुलभतेने उपचार घेता यावेत आणि अधिकाधिक रुग उपचार करून घेण्यास पुढे यावेत यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे कोरोना ला आळा घालण्यास मदत होईल असे ही अमित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.









