नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीएसआयआरच्या (Council of Scientific and Industrial Research) सोसायटीच्या एका बैठकीचे नेतृत्व केले. व्हिसीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यासोबतच या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन , प्रतिष्ठित वैज्ञानिक, उद्योगपती आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थितीत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे, कामाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सीएसआयआर बद्दल लोकांना माहिती मिळायला हवी. आपल्या देशातले वैज्ञानिक, संशोधक कशासंदर्भातलं काम करत आहेत, हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवं. त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करुन देण्याचा सल्ला मी देत आहे. कोरोनाच्या सर्वात मोठ्या संकटात एका वर्षात लस, कीट तयार केली. खूप कमी वेळात संशोधन केले. दीड वर्षात शास्त्रज्ञांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. कोरोना काळात अभूतपूर्व योगदान शास्त्रज्ञांनी दिलं आहे, असं म्हणत मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
आज भारत शेतीपासून ते अवकाश संशोधनापर्यंत, शस्त्रसज्जपासून ते कोरोना लसीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर आणि सशक्त बनू इच्छित आहे. कोरोना संकटामुळे जरी वेग मंदावला असेल तरी पण आत्मनिर्भर भारत हा संकल्प आहे. कितीही संकटे आली तरी संकल्प पूर्ण करणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.