प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एखाद्या व्यक्तीचा अहवाल जर कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्या व्यक्तीला रूग्णात नेण्यापासून त्याच्या उपचार करणे आणि त्यासाठी आवश्यक ऑक्सिजनसह इतर बाबींसाठी रूग्णाचे नातेवाईक भीतीमुळे गोंधळून जातात. असे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी आम आदमी पार्टीने हेल्पलाईन सुरू केली आहे.
हेल्प लाईन विषयी माहिती देताना आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रूग्ण आणि त्याचे नातेवाईक भीतीमुळे गोंधळून जातात. त्यांना नेमके काय करायचे?, हॉस्पिटलला जायचे की कोविड केअर सेंटरला? या बाबत योग्य निर्णय घेता येत नाही. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा नेमक्या कुठे उपलब्ध होवू शकतील याचीही माहिती नसते. अशा आपत्कालिन संकटकाळात त्याना मदत करण्याच्या हेतूने आम्ही कोरोना हेल्पलाईन सुरु केली आहे. 7718812200 या हेल्पलाईन नंबरवर रूग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा, असे आवाहन संदीप देसाई यांनी केले आहे.
अशी होणार रूग्णांच्या नातेवाईकांना मदत
नातेवाईकांचा आपच्या 7718812200 या हेल्पलाईनर फोन आल्यानंतर रुग्णांची सद्यःस्थिती समजून घेवुन त्यांना, त्यांना पुढील प्रमाणे मदत करण्यात येणार आहे.
1) ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड, आयसियू बेड कुठे उपलब्ध होवू शकेल याची माहिती देणे.
2) आपल्या जवळच्या कोविड केअर सेंटरची माहिती व बेडची उपलब्धता याची माहिती देणे.
3) ऑक्सिजन कुठे उपलब्ध होवू शकेल याची माहिती देणे
4) रूग्णवाहिका उपलब्ध करुन देणे.
5) प्लाझ्मा उपलब्धतेबाबात माहिती देणे
एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास तिच्या नातेवाईकांनी गेंधळून न जाता महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयच्या कोविड माहिती केंद्रात किंवा आम आदमी पार्टीच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा. गोंधळून न जाता व्यवस्थित माहिती घेऊन निर्णय घ्यावा.
-संदीप देसाई, प. महाराष्ट्र अध्यक्ष आम आदमी पार्टी.