वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रुपयाच्या विनिमय दरातील वाढीदरम्यान राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याच्या किंमती 516 कोटी रुपयांनी घसरून 44,517 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आल्या आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणूची भीती दिसून येत असून, भारतीय बाजारही कोरोनाच्या प्रभावाखाली आला आहे. गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, येत्या काही दिवसात सोने 10 ग्रॅमसाठी 50 हजारांपर्यंत पोहोचू शकते, असे तज्ञांकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. एचडीएफसी सिक्मयुरिटीजच्या मते, सोमवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 45,033 रुपये होता. याउलट चांदीचा दर 146 रुपयांनी वाढून 47,234 रुपये प्रति किलो झाला आहे.
दीर्घ कालावधीसाठी सोन्याच्या गुंतवणुकीमुळे चांगली कमाई होऊ शकते. पुढील 10-12 महिन्यांत वायदा बाजारात सोन्याचे दर 50 हजारांपर्यंत पोहचण्याची शक्मयता आहे. कोरोनामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक वाढू शकते. तसेच गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढवू शकतात. कोरोना विषाणूला नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असे मोतीलाल ओसवालचे उपाध्यक्ष आणि रिसर्च हेड, नवनीत दमानी यांनी सांगितले.