वाचा तरुण भारत न्युजवर सविस्तर वृत्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दर्शन वेळेत बदल करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला असुन अंबाबाई मंदिरातील दर्शनाची वेळ या पुर्वी सकाळी ६ ते रात्री ८ अशी वेळ होती. ती दि. २५ /२ /२०२१ पासून सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली आहे. तसेच दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिर पूर्णपणे बंद रहाणार असल्याचे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दर्शन वेळेत करण्यात आलेले बदल हे शासन निर्णयानुसार करण्यात आले आहेत तसेच सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बरोबर सोशल डिस्टंन्सिसह सॅनिटायजर हातावर घेऊन दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच मंदिर परिसरात फोटो काढताना आढळल्यास मोबाईल फोन जप्त केला जाईल अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश जाधव यांनी दिली आहे. या बैठकीस जुना राजवाडा पोलीस निरीक्षक श्री जाधवसो, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, पुजारी प्रतिनिधी माधव मुनिश्वर आदि मान्यवर उपस्थित होते.