नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. परस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. याच पार्श्वभूमिवर आधारित माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी केंद्र सरकारला पाच सुचना केल्या आहेत. मनमोहन सिंग यांनी या पत्रात म्हटले आहे की, कोरोना लसीकरणाचा वेग वाढावयाला पाहिजे. किती लोकांनी लस घेतली याहीपेक्षा लोकसंख्येच्या किती टक्के लोकांनी लस घेतली याकडे लक्ष देण्याची गरज आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या पत्राची माहिती माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी ट्वीट करत दिली आहे.
या पत्राबाबत पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये कोरोनाच्या साथीविरोधात लढण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण सुचना करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा त्वरित स्वीकार करून पुढील पावले उचलावीत.
सीडब्ल्यूसीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान मिळालेल्या सुचना या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधानांना लिलिहेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
वेगवेगळ्या लसींबाबत सरकारचे काय आदेश आहेत. तसेच पुढच्या सहा महिन्यांमध्ये कोरोनाच्या लसीचा साठा मिळण्याबाबत काय परिस्थिती आहे, हे सरकारने सांगितले पाहिजे. तसेच विविध राज्यांना त्यांना अपेक्षित असलेला लसींचा साठा कसा मिळेल, हे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. तसेच राज्यांना फ्रंटलाइन वर्कर्सच्या श्रेणी परिभाषित करण्याची सूट दिली गेली पाहिजे, अशी सुचना त्यांनी केली आहे.
भारत सरकारने लसनिर्मात्यांना काही अधिकच्या सवलती दिल्या पाहिजेत. इस्राइलप्रमाणे अनिवार्य लायसन्सिंगची व्यवस्था लागू केली पाहिजे. ज्या लसींना युरोपियन मेडिकल एजन्सीने किंवा यूएसएफडीएने मान्यता दिली आहे, अशा लसींची आयात करून त्या उपयोगात आणल्या पाहिजेत.









