चेन्नई \ ऑनलाईन टीम
देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत महत्वाची टिप्पणी केली आहे. देश कोरोनाशी लढा देत असतानाही राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी हा संताप व्यक्त केला. देशभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. तुमची संस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
न्यायालाने सांगितलं आहे की, जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे हे जरी असलं तरी जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना आपला हा अधिकार बजावता येईल. सद्य परिस्थितीत बचाव व सुरक्षा यालाच सर्वाधिक प्राधान्य पाहिजे. उर्वरीत सर्व बाबी यानंतर येतात.
Previous Articleसाताऱ्यात बॅरिटेकेट नुसतेच नावाला
Next Article घरातही करा मास्कचा वापर









