ऑनलाईन टीम / लंडन :
कोरोनाच्या दहशतीने ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांना बर्मिंघॅम पॅलेसमधून विंडसर कॅसलमध्ये हलविण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यांना आणि प्रिन्स फिलिपला सैंड्रिगममध्ये वेगळे ठेवण्यात येणार असल्याची माहिती राजघराण्यातील सूत्रांनी तेथील स्थानिक माध्यमांना दिली आहे.
राणी एलिझाबेथ यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, बर्मिंघॅम पॅलेसमध्ये जगभरातील नेत्यांचे ये-जा होत असते. त्यामुळे एलिझाबेध यांना खबरदारीचा उपाय म्हणून विंडसर कॅसलमध्ये हलविण्यात आले आहे. एलिझाबेथ यांनीही कोरोनाची धास्ती घेतली आहे. पॅलेसमधील कर्मचाऱयांमध्येही कोरोनाची भीती वाढली आहे.
एलिझाबेध यांचा 94 वा वाढदिवस काही दिवसांवर आला आहे. बर्मिंघम पॅलेसमध्ये अंदाजे 500 लोक आहेत, विंडसरमध्ये 100 आणि सैंड्रिगममध्ये 12 जणांचा स्टाफ आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1 हजार 140 लोकांना कोरोना झाल्याचं आढळून आले आहे. त्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जोखीम टाळत एलिझाबेथ यांना विंडसर कॅसलमध्ये हलविण्यात आले आहे.









