म्हावशी / वार्ताहर
कोरोनाच्या वाढत्या काळात बँकेत अर्थ सहाय्यासाठी होत असलेल्या गर्दीमुळे संसर्गात भर पडून नये म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र व उमेद कक्ष पंचायत समिती पाटण यांनी म्हावशी गावात महिला बचत गटांना त्यांच्या दारात जाऊन केले लाखो रुपयांचे अर्थसाहाय्य.
कोविड 19 चा प्रादुर्भाव सध्या कमालीचा वाढत आहे. महिला स्वंयसहाय्यता समूहातील महिलांना अर्थ सहाय्यासाठी बँकेच्या रांगेत तासंतास उभे रहावे लागू नये यासाठी शासनाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कक्ष पाटण पंचायत समिती व बँक ऑफ महाराष्ट्र यांनी म्हावशी येथील समूहातील महिलांच्या घरी जाऊन बँक शाखा अधिकारी राजेशकुमार कुशवाह, अविनाश सुतार, धनंजय लंगोटे तर पंचायत समिती कर्मचारी रुपेश डाबेराव, रुपाली यादव, सुनंदा मोहिते, चंदा चव्हाण यांनी गटातील महिलांची केवायसी कागदपत्रे पूर्तता करून घेतली. 13 बचत गटांना 15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. यासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मीना साळुंखे, सदस्या उज्वला लोहार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गावचे सरपंच शंकरराव घाडगे ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









