प्रमोद कोचेरी यांचे प्रतिपादन : तालुका भाजपच्यावतीने फेसशिल्ड सॅनिटायझरचे वितरण
वार्ताहर / खानापूर
कोरोना महामारीच्या लाटेमुळे बेळगाव जिल्हय़ातही पॉझिटिव्हची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. सद्यपरिस्थितीत यावर नियंत्रण आले असले तरी अजून धोका टळलेला नाही. पण गेल्या वर्षभरात खानापूर तालुक्मयात आलेल्या संकटकाळात पहिल्या टप्प्यातील कोरोनायोद्धा म्हणून पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तालुक्मयाच्या कानाकोपऱयात घडणाऱया गोष्टी सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी वृत्तपत्रांनी फार मोलाची जबाबदारी पार पाडली आहे.
तालुक्मयातील पत्रकारांनी जिवाची पर्वा न करता सत्यता व योग्य बातम्यांचे नियोजन करत रुग्णांचीही सेवा करण्यासाठी कार्यतत्पर रहात असल्याने पहिल्या फळीतील कोरोना योद्धा ठरत असल्याचे विचार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी व्यक्त केले. गुरुवारी खानापूर तालुका भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तालुका पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱयांना फेसशिल्ड, सॅनिटायझर व मास्क वितरणप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी तालुका युवा मोर्चा भाजपाचे अध्यक्ष दर्शन किल्लारी यांनी करून कोरोना काळातील पत्रकारांच्या जनसेवेच्या कार्याचे कौतुक करुन स्वागत केले. त्यावेळी भाजप अध्यक्ष संजय कुबल, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांनीही पत्रकारिता व समाजकार्य याबद्दल विचार मांडले. पत्रकार प्रकाश देशपांडे यांनी पत्रकारांनी कोरोनाच्या गंभीर काळात पहिल्या टप्प्यातील कार्यकर्ता म्हणून काम करत अनेक रुग्णांची सेवा करण्यातही मागे राहिले नाहीत. या पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा युवा मोर्चा तसेच पदाधिकाऱयांनी संरक्षणार्थ देऊ केलेली मदत ही लाखमोलाची असल्याचे विचार मांडले. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुऱहाडे यांनीही भाजपच्या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी, वासुदेव चौगुले, सुहास पाटील, आप्पाजी पाटील, नागेंद्र चौगुला, रुदेश संपगावीसह अनेक पत्रकार तसेच भाजपा नेते सुरेश देसाई, मारुती पाटील, सेपेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, नगरसेवक आप्पय्या कोडोली, तानाजी गोरल, युवा मोर्चाचे मारुती टक्केकर, रुद्राप्पा तूलजी, बालेश अक्षीमनी, नागराज निंबाजी, मारुती उमनगोळ यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









