प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शुकवारी कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 180 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 419 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 88 झाली आहे. जिल्हय़ात गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांत घट झाली आहे. परिणामी सक्रीय रूग्णसंख्येतही घट झाली आहे.
जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 340 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 306, नगरपालिका क्षेत्रात 652, शहरात 875 तर अन्य 507 आहेत. दिवसभरात 1 हजार 419 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 23 हजार 916 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 180 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 48, भुदरगड 33, चंदगड 16, गडहिंग्लज 18, गगनबावडा 3, हातकणंगले 146, कागल 45, करवीर 166, पन्हाळा 68, राधानगरी 52, शाहूवाडी 13, शिरोळ 149, नगरपालिका क्षेत्रात 122, कोल्हापुरात 269 तर अन्य 32 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 39 हजार 344 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 3 हजार 268 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 880 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 4 हजार 659 अहवाल आले. त्यातील 4 हजार 198 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 134 रिपोर्ट आले. त्यातील 788 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 9 हजार 61 स्वॅब रिपोर्ट आले.
कोरोनाने शहरातील 5 जणांचा मृत्यू
कोरोनाने सांगली जिल्हय़ातील वाळवा तालुक्यातील दोघांचा तर कोल्हापूर शहरातील 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांमध्ये सुभाषनगर, माळी कॉलनी, राजारामपुरी, राजारामपुरी दहावी गल्ली, जैन गल्ली रविवार पेठ, वरूणतीर्थ शिवाजी पेठ येथील व्यक्तींचा समावेश आहे.
……..
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 267 911 1180
आजपर्यतचे बाधीत 39093 99982 1,39,344
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1419 1,23,916
दिवसभरातील मृत्यू 5 29 34
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 870 3565 4340
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 373 2880 3268
अँटीजेन 461 4198 4659
ट्रुनेट 346 788 1134
Previous Articleसातारा जिल्हय़ातील बंधने शिथिल, विकेंड लॉकडाऊन कायम
Next Article नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समिती आक्रमक









