प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळमध्ये सध्या कोरोनाबरोबरच इतर साथींच्या आजारामुळे जनता त्रस्त झाली आहे. हे आजार कायमचे दूर व्हावेत याचबरोबर पिकांचे होणारे नुकसान, पिकांवर पडणारा रोड, जनावरांचे आरोग्य चांगले रहावे या सर्वांसाठी अनगोळची ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिर येथे होम, हवन करण्यात आले. प्रगतशील शेतकरी सातगौडा व देवकी सातगौडा या दांपत्यांच्या हस्ते होमहवन व पूजा, अर्चा करण्यात आली.
अनगोळमधील काही मंदिरांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्या मंदिरांचा जिर्णोध्दार करावा. काही मंदिरांची जी दुरावस्था झाली आहे तसेच त्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्या सर्व परिसराचा विकास साधावा यासाठी ज्ये÷ पंचांनी एकत्र येवून त्यावर चर्चा करावी, अशी मागणीही करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर रोगराईही वाढत आहे. त्यासाठी धार्मिक विधी करणे महत्वाचे असून पंच मंडळींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंदिरामध्ये होमहवन करण्यात आला. यावेळी अर्जुन लोहार, पुरोहीत रंगनाथ अन्नीनाथ व अवधूत भटजी यांच्या उपस्थितीत होमहवन कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील ज्ये÷ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पंचमंडळी उपस्थित होती.









