न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
एकदा कोरोनाची बाधा होऊन गेल्यानंतर त्याच व्यक्तीस पुन्हा बाधा होणे जवळपास अशक्य असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी केले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांसाठी हे सकारात्मक वृत्त आहे. तथापि, काळजी घेणे हे कोरोनातून बरे झाल्यानंतरही अत्यावश्यक आहे. कारण तज्ञांचे वरील मत प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात शंभर टक्के योग्य आहे असे म्हणता येणार नाही, अशीही पुस्ती तज्ञांनी जोडली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा या विषाणूचा संसर्ग झाल्याची काही उदाहरणे ऐकावयास मिळतात. पण या अपवादात्मक केसेस आहेत. सर्वसाधारणपणे या आजाराचा पुन्हा त्याच व्यक्तीत प्रादुर्भाव होत नसल्याचे आढळून आल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप यावर संशोधन सुरू असल्याने कोणीही बेसावध राहू नये असेही आवाहन तज्ञाांकडून करण्यात येते.









