हाच कल राहिल्यास सक्रीय रुग्ण 102 दिवसात निम्मे होतील
कोरोनाकाळात रुग्ण किती दिवसांमध्ये दुप्पट होत आहेत हे ऐकण्यात आले असेलच. परंतु आता 5 महिन्यांनी सलग 9 दिवस सक्रीय रुग्ण वाढण्याचा दर शून्याच्या खाली आहे. याचमुळे गणतीही बदलली आहे. 20 ते 28 सप्टेंबरपर्यंत सक्रीय रुग्ण वाढण्याचा सरासरी दर उणे 0.21 टक्के राहिला आहे. हाच कल कायम राहिल्यास पुढील 102 दिवसांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या निम्म्यावर येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार सक्रीय रुग्ण वाढण्याचा दर सलग 14 दिवस शून्याच्या खाली राहिल्यास त्याला कोरोनाचा पीक मानले जाते. याच आधारावर अमेरिका, ब्राझील आणि युरोपीय देशांनी स्वतःच्या येथे रुग्णसंख्येचे टोक गाठल्याचे जाहीर केले आहे.
मध्यप्रदेशात अँटीजेन चाचणीत आढळलेल्या लक्षणरहित रुग्णांची नोंद न करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. अशाचप्रकारे गुजरात, पश्चिम बंगाल आणि तेलंगणाच्या आकडेवारीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
देशात 20 ते 28 सप्टेंबर या कालावधीत एकूण 56,298 सक्रीय रुग्ण कमी झाले आहेत. यातील 35,818 महाराष्ट्रातील आहेत. 21 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रीय रुग्ण कमी होण्याचा कल मागील 2 आठवडय़ांपासून राहिला आहे. बिहारमध्ये वृद्धी दर उणे 1.2 टक्के राहिला आहे. परंतु ईशान्येत सिक्कीम (48.5 टक्के), अरुणाचलप्रदेश (33.4 टक्के) आणि मणिपूरमध्ये (26.2 टक्के) सक्रीय रुग्ण अचानक वाढू लागले आहेत. अमेरिकेत सक्रीय रुग्णसंख्या 25 लाखांवर आहेत. तर ब्राझीलमध्ये हा आकडा कमी होत 5 लाखांनजीक पोहोचला आहे. कुठल्याही स्थिती संसर्ग रोखू
स्पेनमधील संसर्गाची लाट रोखण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलू असे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या निर्णयांमुळे रुळावर येत असलेल्या व्यवसायाला पुन्हा नुकसान होऊ शकते असे माद्रिदच्या स्थानिक प्रशासनाने म्हटले होते. युरोपीय देश आणि विशेषकरून फ्रान्समध्ये संसर्ग वाढतोय, याचमुळे कठोर पावले उचलावी लागणार आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. मालदीवने मानले आभार
कोविड-19 महामारीदरम्यान 25 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत केल्याप्रकरणी मालदीवने भारताचे आभार मानले आहेत. महामारीने जागतिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आमचे मित्र आणि द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय भागीदारांशिवाय मालदीव या संकटाला सामोरा जाऊ शकला नसता असे उद्गार विदेशमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी काढले आहेत.
भारताने स्वतः आव्हानाला सामोरा जात असतानाही सर्वात मोठी आर्थिक मदत केल्याचे त्यांनी म्हटले आहे.