ऑनलाईन टीम / जिनेव्हा :
जगभरात कोरोना प्रतिबंधक लसी तयार झाल्या असल्या तरी देखील कोरोनाचा समूळ नाश होणे अशक्य आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस अधनॉम घेबेरियस यांनी म्हटले आहे.
ब्रिटिश कोरोनावर चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य परिषदेने तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. मात्र, सविस्तर चर्चा करण्यासाठी ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना टेड्रॉस म्हणाले, जगात काही ठिकाणी कोरोना आटोक्यात आला असला तरी काही देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. तेथील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच प्रशासनावर दबाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कायम आहे. कोणीही कोरोना संपल्याच्या भ्रमात राहू नये. योग्य ती काळजी घ्यावी. येत्या 100 दिवसात सर्व देशांनी लसीकरण मोहीम राबवावी, अशी अपेक्षाही परिषदेने व्यक्त केली.









