मुंबई
दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात क्वारंटाईन विभागात उपचार सुरू होते. सदर व्यक्तीची कोरोना चाचणी झाली होती. मात्र, या व्यक्तीचा मफत्यू कोरोनामुळे झाला की अन्य आजारामुळे याची खात्री केली जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
ही व्यक्ती 5 मार्च रोजी दुबईहून आली होती. त्याला 7 मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आमुंबई
दुबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयात क्वारंटाईन विभागात उपचार सुरू होते. सदर व्यक्तीची कोरोना चाचणी झाली होती. मात्र, या व्यक्तीचा मफत्यू कोरोनामुळे झाला की अन्य आजारामुळे याची खात्री केली जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
ही व्यक्ती 5 मार्च रोजी दुबईहून आली होती. त्याला 7 मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर श्वसनासंबंधीच्या आजाराचे उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद दिला. मात्र, शनिवारी त्या रुग्णाचा मृत्यू घोषित करण्यात आला. या रुग्णाला पहिल्यांदा हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्वरित त्याला कस्तुरबा रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजारही होते. उपचारादरम्यान त्याचा मफत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, त्याची पत्नी आणि मुलगा यांना कोरोनाच्या तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 41 झाली आहे. यापैकी एक रुग्ण मुंबईचा हा 49 वर्षाचा 7 मार्च रोजी अमेरिकेवरून परतलेला आहे. तर दुसरा रुग्ण हा पिंपरी-चिंचवड येथील महानगरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात भरती असून, हा 26 वर्षीय तरुण 14 मार्च रोजी अमेरिकेहून परतलेला आहे.
ले. त्याच्यावर श्वसनासंबंधीच्या आजाराचे उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद दिला. मात्र, शनिवारी त्या रुग्णाचा मृत्यू घोषित करण्यात आला. या रुग्णाला पहिल्यांदा हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्वरित त्याला कस्तुरबा रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजारही होते. उपचारादरम्यान त्याचा मफत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, त्याची पत्नी आणि मुलगा यांना कोरोनाच्या तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.