- दमोह जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करत नागरिकांनी खेळली रंगपंचमी
मध्य प्रदेशातील देखील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. असे असले तरी प्रदेशातील दमोह जिल्ह्यात लोकांनी कोरोना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या नियमांना पायमल्ली तुडवले आहे. शुक्रवारी दमोह जिल्ह्यातील नागरिकांनी अशा भयंकर स्थितीतही उत्साहात आणि न घाबरता रंगपंचमी साजरी केली. नागरिक नियमांचे उल्लंघन करत एकमेकांना रंग लावत होते.

- रंगपंचमी डीजेच्या तालावर डान्स करीत साजरी
इतकेचच नाही तर स्टेज वर लावण्यात आलेल्या बॅनरवर जिल्हा व्यापारी मंच असे लिहिले आहे. आणि हे लोक डिजे वर डान्स करताना दिसत आहे. तर स्टेजच्या आजूबाजूला आणि खाली मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असून ते देखील नियमांचे उल्लंघन करत डान्स करीत आहेत.









