ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. त्यातच भारतीय मेडिकल असोसिएशनकडून (IMA) एक धक्कादायक आकडा जारी करण्यात आला आहे. IMA च्या मते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तब्बल 269 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. IMA सर्व राज्यांचे आकडे जारी केले आहेत. खरे तर पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या लाटेत एकूण 748 डॉक्टरांच्या मृत्यू झाला होता.
IMA जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात दुसऱ्या लाटेत बिहार राज्यात सर्वात जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील 78 डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील 37 डॉक्टरांचा मृत्यू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाला आहे.
यानंतर दिल्लीतील 28 डॉक्टर आणि आंध्र प्रदेशातील 22 डॉक्टरांचा कोरोनाने बळी घेतला आहे. याशिवाय सर्वात जास्त कोरोनाचे प्रमाण असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 14 डॉक्टरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपला जीव गमावला आहे.