कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर शहर व परिसरातील ख्रिश्चन समाजातील कोरोनाग्रस्त मृतदेह दहन केले जाऊ नये. तसेच अशा प्रकारे काही हॉस्पिटल लेखी घेत असतील तर अशा हॉस्पीटलवर करावाई करावी. ख्रिस्ती समाजाचे मृतदेह कोणत्याही परिस्थितीत दहन करू नये, सतेज उर्फ बंटी पाटील यांना विनंती केली आहे, अशी मागणी शिष्टमंडळाने कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कलशेट्टी यांना केली.
यापुढे कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ती समाजरीतीप्रमाणेच अंत्यसंस्कार केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले; तसेच संबंधित आधिकार्यांना याबाबतच्या सुचना दिल्या. संबधित हॉस्पीटलवर देखील करावा केली जाईल ,असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले. यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, फादर अशोक शिंदे, आशूतोष बेडेकर,वॉल्टर कट्टी, प्रमोद शेंडगे, शाबीद वाघमारे, दिनकर जाधव, अब्राहम वाघमारे, राजेश वाघमारे, रमेश रणभिसे उपस्थित होते.








