ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असल्या, तरीदेखील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना योग्य उपचारांची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओडिशा सरकार आता देशातील सर्वात मोठे ‘कोविड-19 टिमेंट’ रुग्णालय उभारणार आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 727 वर पोहोचली असून, आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. मात्र, दिवसेंदिवस देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने ओडिशा सरकार देशातील सर्वात मोठे ‘कोविड-19 टिमेंट’ रुग्णालय उभारणार आहे.
तब्बल एक हजार बेडची व्यवस्था
या रुग्णालयात तब्बल एक हजार बेडची व्यवस्था असणार आहे. ओडिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून ‘कोविड-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारत आहे. याबतचे आदेश मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिले असून, रुग्णालयाच्या निर्मितीसाठी सरकार तयारीला लागले आहेत.