मुंबई :
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राचा मल्ल जागतिक पदक विजेता डीवायएसपी राहूल आवारे देखील पुढे आला आहे. मुख्यमंत्री कोरोना रिलीफ फंडासाठी त्याने वैयक्तिक दोन लाख रुपयांची मदत केली आहे. देशभर कोरोना विषाणू साथीने थैमान घातले आहे.पूर्ण देश लॉकडाऊन आहे. महाराष्टात पोलीस, प्रशासन व आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा करत आहेत. महाराष्ट्रावर आलेल्या या संकटातून लवकर बाहेर येण्यासाठी व शासकीय मदतीसाठी खारीचा वाटा उचलण्यासाठी महाराष्ट्राचा पैलवान तथा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता, जागतिक कांस्यपदक विजेता, पोलीस उपअधीक्षक पैलवान राहुल आवारे यांनी 2 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री कोरोना रिलीफ फंडात जमा केला आहे.









