प्रतिनिधी /बेळगाव
चिकोडी तालुक्मयातील वाळकी गावामध्ये लॉकडाऊन काळात सायंकाळी 7 च्या दरम्यान शेतकऱयांकडून जमिनीचा फाळा वसूल करण्यात येत होता. त्यामुळे त्यांना याबाबत विचारले असता सरकारने आम्हाला टार्गेट दिले आहे. त्यामुळे आम्हाला काम करावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारच नियम लागू करते आणि सरकारी कर्मचारीच ते नियम तोडतात. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सरकारने लॉकडाऊन काळात कोणीही बाहेर पडू नये. एकमेकांच्या घरी जाऊ नये, असा आदेश काढला होता. मात्र, वाळकी ग्राम पंचायतीचे कर्मचारी शेतकऱयांच्या घरोघरी जाऊन फाळा वसूल करत होते. कोरोना काळात अशा प्रकारे घरी जाणे चुकीचे आहे.
तेव्हा चिकोडी तहसीलदार तसेच शेतकऱयांना वेठीस धरणाऱया संबंधित कर्मचाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे ऍड. पूजा काकतकर, श्रीनिवास खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









