प्रतिनिधी / रत्नागिरी :
एका बाजुला कोरोनाचा कहर वाढत असताना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या व्यवसाय अधिक कौशल्याने करुन नफ्यात भरघोस वाढ केली आहे. जुलै 2019 ते जुलै 2020 दरम्यान झालेल्या उलाढालीमध्ये बँकेचा नफा 20 कोटी 64 लाखांवर पोहचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 5 कोटीहून अधिक रकमेची नफावाढ झाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.
त्यांनी सांगितले जुलै 2019 मध्ये बँकेचे भाग भांडवल 50 कोटी 39 लाख रुपये होते. ते यावर्षीच्या जुलै अखेर 51 कोटी 84 लाखांवर पोहचले. जुलै 2019 अखेर 142 कोटी 67 लाख रुपये गंगाजळी होती. ती वाढून जुलै 2020 मध्ये 157 कोटी 20 लाखांवर पोहचली.
बँकेकडील ठेवीमध्येही भरीव वाढ झाली आहे. जुलै 2019 अखेर 1885 कोटी 4 लाख रुपयांच्या ठेवी होत्या. जुलै 2020 अखेर 1935 कोटी 25 लाख रुपये एवढय़ा ठेवी झाल्या आहेत. कोरोना काळ असूनही बेकेकडे 50 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.चोरगे यांनी सांगितले गेल्या वर्षभरात कर्ज मागणीचे प्रमाण कमी झाले आहे. जुलै 2019 अखेर बँकेने 1514 कोटी 58 लाखांचे कर्ज दिले होते. जुलै 2020 अखेर 1173 कोटी 1 लाख रुपये इतक्याच कर्जाचे वितरण बॅंक करु शकली आहे. बाजारातील परिस्थितीमुळे ही घट झाली आहे.
बँकेच्या गुतवणुकीत वाढ झाली आहे. जुलै 2019 मध्ये 678 कोटी 40 लाख रुपये ब्ँाकेने विविध †िठकाणी गुंतवणुक केली होती. जुलै 2020 मध्ये 882 कोटी 48 लाख रुपये एवढी गुंतवणुक वाढली आहे. बँकेच्या नफ्यातही भरघोस वाढ केली आहे. जुलै 2019 मध्ये बँकेला 14 कोटी 91 लाख ऐवढा नफा झाला होता. जुलै 2020 मध्ये बँकेच्या नफ्यात वाढ झाली तो 20 कोटी 64 लाखांवर जाऊन पोहचला.
मार्च 2020 मध्ये 47 कोटी 47 लाख रुपये एवढी एनपीए कर्ज होती. जुलै 2020 मध्ये त्यापैकी 15 कोटी 44 लाखांची रक्कम वसुल झाली आहे. कोरोनाकाळ असूनही बँकेच्या कर्मचाऱयांनी वसुलीबाबत चांगली कामगीरी केल्याने 15 कोटीहुन अधिक रक्कम 4 महिन्यात वसूल होऊ शकली. बँकेचे व्यवस्थापकिय संचालक सुनिल गुरव यांनी सांगितले अध्यक्ष व संचालक यांचे नेहमी मार्गदर्शन असते. त्यांच्या प्रोस्ताहनामुळे अधिकाधिक कर्मचारी यांनी वसुलीची चांगली कामगिरी उत्तमरित्या केली.









