बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात मंगळवारी कोरोना बाधितांची संख्या वाढली. राज्यात मंगळवारी १,२८० नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर १०६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान राज्यात आत्तापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८,९५,२८४ वर पोहोचली आहे. तर यापैकी ८,५८,३७० रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. म्हणजेच ९५.८७ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या २५,०१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ११,८८० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या २७५ वर आली आहे. तर मंगळवारी राज्यात मृत्यू दर १.३२ टक्के होता.
आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४तासात १८,१०३ जलद प्रतिजैविक आणि ७०,५९५ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ८८,६९८ नमुन्यांची तपासणी केली.
दरम्यान राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. मंगळवारी जिल्ह्यात ६३८ कोरोना रुग्णांची भर पडली. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३,७५,१६३ वर पोहोचली आहे. यापक्की ३,५१,४९७ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. जिल्ह्यात सध्या १९,४६८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत ४,१९७ रुग्णांचा मृत्यू केला झाला आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.









