वार्ताहर / कबनूर
कोरोची तालुका हातकणंगले येथील रेशन दुकानदारांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व केशरी कार्डधारकांना रेशन दुकानात धान्य देण्यास सुरुवात केली आहे. कोरोणा विषाणू परिस्थितीत व संचारबंदी काळात रेशन धारक रेशन धान्य पासून वंचित राहू नये यासाठी सर्व केशरी कार्डधारकांना प्रत्येक व्यक्तीस दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू याप्रमाणे 25 तारखेपासून रेशन धान्य दुकानातून धान्य वाटप चालू आहे केसरी कार्ड चालू असो अथवा नसो आधारकार्ड घेऊन जाऊन रेशन दुकानदारांची संपर्क साधावा तसेच कोणतेही फॉर्म कोणाकडेही भरावयाचे नाही असे आवाहन सरपंच रेखा पाटील व ग्राम विकास अधिकारी रा जू जाधव यांनी केले आहे. कार्ड धारक धान्य आणताना कोणत्याही प्रकारचे वाहनाचा उपयोग करायचा नाही तसेच तोंडाला मास्क लाऊनच यावयाचेआहे. तसेच सोशल डिस्टन्स ठेवूनच धान्य द्यावयाचे आहे असे सक्त सूचना देण्यात आलेली आहे.









