प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊनमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील विविध शहरातील बंद असलेली पी आर एस काउंटर 22 मे पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.
कोकण रेल्वेमार्गावरील माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडप्पी, कुमटा, बेंदूर येथील कोकण रेल्वेचे काउंटर लॉकडाऊन काळात बंद ठेवण्यात आलेली होती. मात्र आता ही सर्व काऊंटर सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शुक्रवार सकाळपासून रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे रेल्वे रिझर्वेशनसाठी प्रवाशीवर्गाचा प्रतिसाद लाभत असल्याचे सांगण्यात आले.









