प्रतिनिधी / बेळगाव
कोरे गल्ली, शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने म. ए. समितीच्या आयसोलेशन सेंटरला मदत देण्यात आली. आयसोलेशन सेंटरमध्ये उपचार घेणाऱया रुग्णांना लागणारे अन्नधान्य तसेच इतर साहित्य मंडळाच्यावतीने देण्यात आले. यावेळी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, राजू बिर्जे, सूरज कुडुचकर, सुनील बोकडे, सूरज गवळी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कल्लाप्पा हंडे, पुंडलिक मंडोळकर, सुरेश बोकडे, अरुण कडोलकर, रणजित हावळाण्णाचे, पवन कित्तुरकर, रोहित वायचळ, शिवा नेसरीकर, महेश पाटील, विनायक कित्तुरकर यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.









