ऑनलाईन टीम / मुंबई :
एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. स्वामी पार्किन्सनसह अनेक आजारांनी ग्रस्त होते. मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलाने ही माहिती दिली. स्टेनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती.
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा-कोरेगाव येथे एल्गार परिषद झाली. त्यावेळी दलित समाजाच्या या कार्यक्रमात हिंसाचार उसळला. जमावाकडून वाहनांची जाळपोळ, दुकाने आणि घरांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणात माओवाद्यांशी संपर्क ठेवल्याबद्दल काही जणांना अटक करण्यात आली होती, त्यापैकी एक स्टॅन स्वामी होते.








