सातारा/प्रतिनिधी
मान्सून पूर्व शेतीचे काम करत असताना शेतनजीक असलेल्या डीपीच्या तारेतून विधुत करंट उतरून शेतकऱ्यास शॉक लागुन मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे दुपारी 1 वाजता घडली. हणमंत अशोक घोरपडे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून पिंपोडे येथील आरोग्य केंद्रात त्यांच्या शव विच्छेदन करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे हणमंत घोरपडे हे शेतात पेरणी करण्यापूर्वी गवत पालापाचोळा गोळा करत होते. शेताला लागून डीपी असून त्याचा ताण काढणारी तार शेतात आहे. तेथील गवत काढत असताना शॉक बसून जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतात गेलेले हणमंत दुपार झाली तरी परत आले नसल्याने कुटूंबियांनी काळजी पोटी शेतात गेले तर त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








