वार्ताहर / वाठार किरोली
वाठार किरोली ता. कोरेगाव येथील कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काकासाहेब गायकवाड यांची कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी पिंपोडेचे जयेंद्र लेंभे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्ताने वाठार ग्रामपंचायत आणि वाठार विकास सेवा सोसायटी यांच्यामार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनशन पाळून काकासाहेब गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
काकासाहेब गायकवाड सत्काराला उत्तर देताना म्हणाले की वाठार सोसायटीचे चेअरमन म्हणून मी राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणून सलग पंधरा वर्षे काम करण्याची संधी मिळाली, पुढे उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचेच फळ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.कै. लक्ष्मणराव पाटील तात्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्यामुळे आणि सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनिलराव माने, संचालक नितीन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस संभाजीराव गायकवाड या सर्वांच्या सहकार्याने मला सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना पोहचविण्यासाठी कटिबद्ध राहीन. यावेळी वाठारच्या सरपंच सविता गुजले, उपसरपंच पोपट गायकवाड, चेअरमन मोहन खिलारे, व्हा. चेअरमन कृष्णत गायकवाड, आदी उपस्थित होते. उपसरपंच पोपट गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आभार सोमनाथ गायकवाड यांनी मानले. काकासाहेब गायकवाड यांचे अभिनंदन सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा नामदार बाळासाहेब पाटील, आदी मान्यवरांनी केले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









