कोरेगाव / प्रतिनिधी
सातारा-लातूर महामार्गावर कोरेगाव शहरात देसाई पेट्रोल पंपासमोर आज पहाटे भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरने विरुध्द दिशेला जाऊन समोरुन येणार्या मोटारसायकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की रस्त्यावर ठिणग्या उडाल्या. या अपघातात मोटारसायकलस्वार ईश्वर चंद्रकांत घोरपडे, रा. सायगाव (एकंबे) याचा मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेले पोलीस हवालदार मोहन ढवळे हे गंभीर जखमी झाले. ट्रॅव्हलरचालकाच्या पायाला देखील मार लागला आहे. दोघा जखमींवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की मुंबई येथील दीपक काटकर हे टेम्पो ट्रॅव्हलर क्र. एम. एच. ०४-जी. पी.-२२८४ घेऊन सातारा-लातूर महामार्गावर पुसेगावच्या दिशेने भरधाव चालले होते, देसाई पेट्रोल पंपासमोर विरुध्द दिशेला जात समोरुन येणारी मोटारसायकल क्र. एम. एच. ११-बी. जी.-०१५२ ला ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार ईश्वर घोरपडे याचा जागीच मृत्यु झाला तर दुचाकीवर पाठीमागेे बसलेले पोलीस हवालदार मोहन ढवळे हे गंभीर जखमी झाले. ट्रॅव्हलरचालक दीपक काटकर हे देखील जखमी झाले आहेत.
मोहन ढवळे हे किन्हई येथील रहिवासी असून, सातारा पोलीस दलात हवालदार म्हणून मुख्यालयात कार्यरत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांना कोरेगाव पोलीस ठाण्याच्या अंकीत बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. स्ट्रायकिंग फोर्समध्ये ते दाखल झाले होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ते एकंबे रस्त्यावरील आपल्या नातेवाईकाकडे आंघोळीसाठी गेले होते. तेथून ते परत कोरेगाव पोलीस ठाण्याकडे येण्यास निघाले होते. त्याचवेळी ईश्वर घोरपडे हे सायगाव येथून कोरेगावकडे येत होते. ढवळे यांनी घोरपडे याच्याकडून लिफ्ट घेतली व दोघेजण बोलत कोरेगावकडे येत होते.
देसाई पेट्रोलपंपासमोर मोटारसायकलला ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, जागेवर ठिणग्या उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती समजताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस नाईक सनी आवटे यांनी गार्ंभीय ओळखून शहरातील दोन रुग्णवाहिकांना बोलावले, मात्र त्या वेळेत न आल्याने अखेरीस पोलीस व्हॅनमधून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ढवळे यांना सातार्यातील खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









