नवारस्ता / प्रतिनिधी :
पाटण तालुक्यात कोयना विभागातील शिरळ गावच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कोयनानगर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्या ताब्यातील 9 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संजय यशवंत कांबळे (वय 46 रा. मळे, कोयनानगर) यांच्याविरोधात कोयनानगर पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस कर्मचारी शिवाजी भिसे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरळ ता. पाटण येथील एका हॉटेलसमोर अवैध दारू विक्री होत असल्याची खबर कोयना पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोयना पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून दारू साठा जप्त केला. यामध्ये विदेशी 180 मिली च्या 36 बाटल्या व देशी 180 मिलीच्या 65 बाटल्या अशा 9330 रुपयांच्या 101 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.









