कोयनानगर : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्याने हादरला आहे. शनिवारी दुपारी १.५५ ला कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाच्या धक्क्याच्या लहरी संपत नाही, तोच ३ मिनिटांच्या अंतराने भूकंपाचा दूसरा सौम्य धक्का याच परिसरात बसला असून भूकंपमापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.९ व ३.०० रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली, तर भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदूचे अंतर वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या वायव्येला ८.० किमी होते.
8 मे रोजी दुपारी १.५५ ला कोयना परिसरात भूकंपाचा पहिला धक्का बसला आहे. भूकंप मापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.९ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. केवळ ३ मिनिटाच्या अंतराने हाच परिसर भूकंपाच्या दुसऱ्या धक्क्याने हादरला आहे. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.० रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्याचे केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून गत महिन्यात २० एप्रिलला कोयना परिसर भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्याने हादरले होते. १८ दिवसांच्या 7 विश्रांतीनंतर कोयना परिसरात भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाच्या धक्क्याची खोली ८ किमी खोल होती.









