नवारस्ता/प्रतिनिधी
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने धरणात प्रतिसेकंद तब्बल 84 हजार 878 क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 10 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा विजगृहतील 2100 आणि सहा वक्र दरवाजा मधून 10 हजार असे मिळून एकूण 12 हजार 100 क्यूसेक्स चा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
सध्या कोयना धरणात 82.53 टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच आहे .त्यामुळे आता आज सकाळी 10 वाजता पुन्हा धरणातून 15 हजार क्यूसेक्स इतका विसर्ग वाढविणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आली. तरी कोयना आणि कृष्णा काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कोयना जलसिंचन विभागाच्या वतीने केले आहे
Previous Articleरामनगर-धारवाड मार्गावर कारची झाडाला धडक : दोघेजण जखमी
Next Article पोलीस कारवाई विरोधात आज बेळगाव सराफपेढी बंद









