सांगली /प्रतिनिधी
आणखी थोड्या वेळाने 11 वाजता कोयनेतून होणारा विसर्ग 54629 क्युसेस वरुन 30000 क्युसेस वर आणला जाणार आहे. सकाळी 11 वाजता हा विसर्ग कमी करणार असे कोयना धरण व्यवस्थापन समितीने म्हटले आहे.
पाउस ओसरला आहे. धरणात 91.42 पाणी साठा आहे. या पार्श्वभूमीवर वक्र दरवाजे 10 फूटावरुन 5 फूटावर आणले जाणार आहेत. कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर असून सांगलीत ती इशारा पातळीखाली आहे. विसर्ग कमी केल्याने ती आणखी उतरेल
महाराष्ट्र व कर्नाटक पाटबंधारे विभागाने समन्वयाने पूर नियंत्रणात चांगली कामगिरी बजावली आहे.








