कोनाळ येथे गवारेड्यांनी घातलेला धुडगूसात अनेक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तेथील महादेव लोंढे यांची जवळजवळ 117 काजू कलमे या गवारेड्यांनी जमीनदोस्त करत हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा कळप कोनाळ परिसरात धुडगूस घालत आहेत. श्री लोंढे यांनी आपल्या नुकसानी संदर्भात कोनाळ विभागाचे वनरक्षक श्री. मोकाडे यांना तात्काळ माहिती दिली श्री. मोकाडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली व पंचनामे केले. केवळ पंचनामे करत बसू नका तर गव्यांचा अगोदर बंदोबस्त करा आमची शेती – बागायती वाचवा अशी मागणी स्वतः लोंढे व इतर ग्रामस्थ यांनी यावेळी केली.
Previous Articleश्री पेढेश्वर देवस्थानच्या पितळीच्या घंटा चोरट्यांनी लांबविल्या
Next Article दोडामार्गमधील १४ पैकी १३ उपोषणे रविवारी मागे









