पेडणे / प्रतिनिधी
बेळगाव येथे गेलेल्या व्यक्ती कोरोना घेऊन कोनाडीला आल्याने कोरगाव परिसरात भितीचे वातावरण पसरले. कोरगाव पंचायत क्षेत्रातील कोनाडी वाडय़ावर 10 रोजी एक नागरिक कोरोना पाॕझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची व इतरांची चाचणी केल्यानंतर मंगळवारी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयातील सात जणांचा अहवाल हा पाॕझिटिव्ह आला. यामुळे गावात तसेच कोनाडी वाडय़ावर व देवसू वाडय़ावर भितीचे वातावरण पसरले. पंचायत मंडळ ग्रामस्थांनी तसेच पेडणे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर आणि पेडणे मामलेदार अनंत मळीक यांची बैठक होऊन या बैठकीत कोनाडी व देवसू भाग हा स्वयंपूर्ण पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंचायत कार्यालयात आलेल्या या बैठलीला व्यासपीठावर पेडणे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर, मामलेदार अनंत मळीक , सरपंच स्वाती गवंडी, पंचसदस्य रंगनाथ कलशावकर, कुस्तान कुयेलो, उदय पालयेकर, वसंत देसाई, प्रमिला देसाई व उमा साळगावकर उपस्थित होते.
ड़ बेळगावहून आणला कोरोना कोनाडीत
कोनाडी येथील व्यक्ती ही आपल्या सासूरवाडीला बेळगाव येथे आपल्या बायकोकडे जून महिन्याच्या शेवटच्या आठावडय़ात बायोकोकडे गेली होती. त्यांनतर ती गोव्यात आल्यानंतर होमक्वारंटाईन राहिली होती.त्यानंतर त्या व्यक्तीला ताप आल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली असाता अहवाल पाॕझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याचीही चाचणी केली असता सातजणांचा अहवाल मंगळवार दि.14 रोजी पाॕझिटिव्ह आला.
ड़ देवसू ,कोनाड भाग स्वं³ा सील करण्याचा पंचायत मंडळ आणि ग्रायस्थां®ाा निर्णय
देवसू व कोनाड भाग हा पूर्ण तसेच पंचायक्षेञ हे लाॕकडाऊन करण्यासाठी ग्रामस्थानी आणला पंचायत मंडळावर दबाव. पंचायत मंडळाने आम्हाला पूर्ण गाव लाॕकडाऊन करण्याचा अधिकारी नसल्याचे सांगितल्यावर ग्रामस्थांनी पंचायत कार्यालयात पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांना बोलवा आम्हाला आमचा जीवाची पर्वा आहे. कोरोना लगण झाल्यास त्याला कोण जबाबदार आहे असे प्रश्न सरपंच व पंचसदस्यांना केले. अखेर सरपंच स्वाती गवंडी यांनी उपमुख्यमंञी आजगावकर यांना फोन करुन कोरगावातील ग्रामस्थ हे पंचायत कार्यालयात आले असून ते लाॕकडाऊन करण्यासाठी दबाब आणत असून पेडणे उपजिल्हाधिकारी तसेच मामलेदार यांना पंचायत कार्यालयात बोलवितात असे सांगितले .उपमुख्यमंञी आजगावकर यांनी पेडणे उफजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांना कोरगाव पंचायत कार्यालयात जाऊन नागरिक व पंचायत मंडळाचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले .त्यानंतर पेडणे उपजिल्हाधिकारी राविशंकर निपाणीकर व पेडणे मामलेदार अनंत मळीक पंचायत कार्यलयात आले असता त्यांचा सोबत ग्रामस्थ , पंचायत मंडळ यांची बैठक झाली.या बैठकीत ग्रामस्थांनी सरकार जर लाॕकडाऊन करण्यास परावानगी देत नसेल कोरोना रुग्ण संख्या व प्रसार होऊ नये यासाठी देवसू कोनाडी भाग हा जोपर्यंत या वाडय़ावरील अन्य व्यक्तीचा अहवाल येत नाही तोपर्यंत सील करावा असा निर्णय घेण्यात आला. तसेच देऊळवाडा येथील सार्वजनिक ठिकाणे दुकाने व अन्य आस्थापने स्वं³ापूर्ण बंद ठेवावी असा निर्णय घेण्यात आला.
ड़ कोरगाव पंचायत मंडळाने मंगळवारी देवसू कोनाडी तसेच कोरगाव पंचायत क्षेत्रात ध्वनीक्षेपक रिक्षाला लावून केली ग्रामस्थांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत केली जागृती .









