प्रतिनिधी / जयसिंगपूर
शिरोळ तालुक्यातील कोथळीचे जवान सतीश सोनाप्पा वायदंडे (वय-36 वर्षे) यांचे सिक्किम येथे अपघाती निधन झाले आहे. गुरुवारी सेवा बजावत असताना त्यांचा अपघात झाला. देशात लॉकडाऊन असल्याने त्यांच्या पार्थिवावर मुख्यालयातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोथळी गावचे सुपुत्र सतिश वायदंडे हे 2009 साली इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर या शिक्षणावर सैन्यातील खात्यामध्ये निवड झाली होती. पुणे, काश्मीर, आसाम येथे त्यांनी देशसेवा बजावली आहे. सतीश हे आपल्या कोथळी या मुळ गावी 25 डिसेंबर 2019 खिस्म्रस या सणासाठी आले होते. यानंतर त्यांनी 2 जानेवारी 2020 ला आपल्या पत्नी सोबत आसाम येथे नोकरीवर रुजू झाले. सतिश वायदंडे यांचे गेल्या 3 वर्षापूर्वी लग्न झाले आहे.
सोमवारी सायंकाळी वडील सोनाप्पा वायदंडे यांच्याशी फोन झाला होता. यानंतर दोन दिवसांपासून सतीश यांना फोन लावण्याचा प्रयत्न करण्यात आला पण फोन होऊ शकला नाही. आज सकाळी सतीश यांच्या सासऱ्यांकडून अपघाती निधन झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर वायदंडे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ यांनी जवान वायदंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. त्याच्या पश्चात वडील, आई, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
मुख्यालयातच होणार अंत्यसंस्कार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन व नाकेबंदी असल्यामुळे शहीद जवान सतीश वायदंडे यांच्या मृतदेहावर हेडकॉर्टर येथेच अंत्यविधी केला जाणार असल्याचे वृत्त असून कोथळी या गावी शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये फोटो पूजन करण्यात येणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








