वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील भू येथे एबी स्वीच बदलण्याचे काम करणाऱया वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुकवारी दुपारी घडली. सुनिल यशवंत चौगुले (32, राह.कोतापूर) असे मयत वायरमनचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महावितरण विभागामध्ये कंत्राटी पध्दतीवर वायरमन म्हणून सेवा बजावणारे कोतापूर जानस्करवाडी येथील सुनिल यशवंत चौगुले शुकवारी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास भू येथे एबी स्वीच बदलण्याचे काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्यांना तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱयांनी तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









