ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. शनिवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या चाचण्यांच्या एक्झिट पोलनुसार बिहारच्या जनतेने राजद-काँग्रेसला कौल दिल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्यक्ष जनतेने मतपेटीतून कोणाला कौल दिला हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
17 व्या विधानसभेच्या स्थापनेसाठी 243 मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. 122 जागा बहुमताचा आकडा ठरण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. तसेच कोणताही पक्ष एकहाती सत्ता मिळवू शकत नाही. मात्र, राजद हा सर्वाधिक मते मिळवणारा तर भाजप हा दुसरा सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष ठरण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली होती. 9 वाजल्यापासून निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात होईल. दुपारपर्यंत बिहारचे सिंहासन कोण राखणार हे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, बिहार विधानसभेसाठी 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 मतदारसंघात, 3 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात 94 मतदारसंघात तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात 78 मतदारसंघात मतदान झाले होते.









